नोकरी धोक्यात! `या` बड्या कंपनीत दोन वर्षात तिसऱ्यांदा नोकरकपात; Resign करा नाहीतर...
Job News : कंपनीकडूनच मागितला जातोय कर्मचाऱ्यांचा राजीनामा. कंपनीवर ही वेळ का आली? इतक्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचं काय? काहीशी चिंतेत टाकणारी बातमी
Job News : जागतिक आर्थिक मंदी, आधुनिक तंत्रज्ञान आणि इतर अनेक गोष्टींमुळे मागील काही वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा वापर कमी करून यंत्रांची जबाबदारी अधिक वाढताना दिसली. परिणामी आर्थिक मंदी आणि या सर्वच बदलांच्या परिणामस्वरुपात नोकरकपातीचा विळखा आणखी घट्ट होत गेला.
आता याच नोकरकपातीचा दणका आणखी एका बड्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बसणार असून, या कंपनीमध्ये समोरूनच कर्मचाऱ्यांना VRS अर्थात स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेत राजीनामा देण्यास सांगितलं जात आहे. सध्या या कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांपुढं मोठी चिंता आणि आव्हानं उभी राहिली असून त्याचीच चर्चा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये होताना दिसत आहे.
कोणत्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?
एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलिनीकरण प्रक्रियेमुळे स्थायी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिथं आता या दोन्ही एअरलाईन्समध्ये साधारण 18 हजार कर्मचारी काम करतात तिथंच आता 500 ते 600 कर्मचाऱ्यांवर नोकरकपातीची तलवार कोसळणार आहे. यामध्ये ग्राऊंड स्टाफची संख्या अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.
ऑप्टिमाइजेशनची प्रक्रिया सध्या या दोन्ही विमानसेवा पुरवणाय़ऱ्या कंपन्यांमध्ये सुरू झाली असून, एअर इंडियाकडून सध्या कर्मचाऱ्यांना एक मेसेजही पाठवण्यात आला आहे. 'आम्ही एअर इंडियामध्ये किमान 5 वर्षे सलग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना VRS आणि पाच वर्षे किंवा त्याहून कमी काम करणाऱ्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी VSS ची घोषणा करत आहोत', असं या मेसेजमध्ये म्हटलं गेलं आहे.
एका महिन्याची मुदत
विस्ताराशी विलिनीकरण प्रक्रिया सुरू असतानाच कंपनीकडून हे कठोर पाऊल उटचलण्यात आलं असून, वीआरएस ही योजना कंपनीमध्ये पाच वर्षांची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असून वीएसएस ही योजना पाच वर्षांहून कमी काळासाठी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. बुधवारपासून कंपनीकडून अधिकृतरित्या या प्रक्रियेस सुरुवात झाली असून संबंधित कर्मचाऱ्यांना वीआरएस किंवा वीएसएससाठीचे अर्ज करण्यासाठी महिन्याभराती मुदत देण्यात आली आहे.
हेसुद्धा वाचा : '...म्हणून मोदींनी तात्काळ गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा घ्यायलाच हवा', 'मोदींनी युक्रेन-रशिया युद्धात..'
प्राथमिक माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा विचार आणि त्यांच्या भविष्याचा विचार करत सध्या एअर इंडियातून नोकरी गमावणाऱ्यांना टाटा समुहातीलच इतर संस्थआंमध्ये नोकरी दिली जात आहे. दरम्यान या संपूर्ण मर्जर प्रक्रियेदरम्यान काही पदांसाठीची आवश्यकता जाणत कमी महत्त्वाची पदं बरखास्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.