तब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी
IT jobs : टेक कंपन्यांमध्ये परिस्थिती बदलली. आर्थिक मंदीमुळं अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या या क्षेत्रात आता मात्र काहीसं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
IT jobs : 2022 च्या अखेरीस आर्थिक मंदीची कुणकूण लागली आणि या जागतिक आर्थिक मंदीच्या संकटानं जगभरातील कंपन्यांना विळख्याच घेतलं. प्रामुख्यानं IT अर्थात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. अनेक मोठ्या कंपन्यांनी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून नोकरकपातीचाही निर्णय घेतला. इथं आयटी कंपन्या गटांगळ्या खात असतानाच काही कंपन्यांनी सुवर्णमध्य साधत कर्मचाऱ्यांना विविध विभागात स्थलांतरित केलं.
जवळपास दीड वर्षांहून अधिक काळापासून या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधीही तुलनेनं कमी होत्या. किमान भारतात तरी हेच चित्र पाहायला मिळालं. आता मात्र ही परिस्थिती धीम्या वेगानं का असेना, पण बदलत असून त्यामुळं या क्षेत्रात नव्यानं नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.
'एक्सफेनो' या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून येत्या काळात भारतातील नोकरी क्षेत्रामध्ये धीम्या गतीनं प्रगती होण्याची चिन्हं आहेत. 2025 मध्ये आयटी क्षेत्रात पहिल्या 5 महिन्यांमध्ये मोठ्या आणि अगदी स्टार्टअप क्षेत्रही प्रगतीपथावर वाटचाल करताना दिसत आहे. सध्या 85 टक्के कर्मचाऱ्यांची माहणी टीयर 1 शहरांमध्ये आहे. तर, अनके कंपन्या आता 40 ते 50 टक्के कर्मचारी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट... राज्यातील 'या' भागांमध्ये क्षणात बदलणार हवामान
सध्या कामाचं स्वरुप आणि मागणी अधिक असून ही सर्व कामं मनुष्यबळाअभावी करणं अशक्य असल्यामुळं आता पुन्हा एकदा आयटी क्षेत्रामध्ये नव्यानं रोजगार उपलब्धता दिसत आहे. या क्षेत्रात सर्वत विभागांमध्ये नोकरभरती सुरु असून, कॅम्पस भरतीचं प्रमाणही वाढवण्यात आहे. मागील 2 ते 4 तिमाहीमध्ये नोकरभरतीचं हे प्रमाण वाढलं असून, इथं वेतनवाढीचेही संकेत मिळत असल्याची बाब निरीक्षणातून समोर आली आहे.