मुंबई : काळ, वेळ, आर्थिक धोरणं सतत बदलली तरीही नोकरीच्या संधीच्या शोधात कधीही खंड पडत नाही. प्रत्येक वर्षी नोकरीच्या शोधात असणारा मोठा वर्ग आपल्या क्षेत्रांमधील संधीचं सोनं कतात. नोकरीसोबतच आणखी एक बाब ओघाओघाने पुढे येते ती म्हणजे पगारवाढ. येत्या वर्षातही असंच चित्र पाहायला मिळणार असून, जवळपास १० लाख नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचं कळत आहे. रोजगारांच्या या संधींसोबतच पगारवाढीचे आकडे जवळपास ८ ते १० टक्क्यांवर स्थिर असतील. तर, काही उद्योगक्षेत्र मात्र याला अपवाद ठरतील. 


रोजगार संधींवर निवडणूकांचे पडसाद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काळातातील लोकसभा निवडणूकांचा अंदाज घेता आणि राजकीय अस्थिरता पाहता पहिल्या सहा महिन्यांमध्ये रोजगार क्षेत्रांमघ्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे आता हे निर्णय आणि त्यानंतरचे बदल नेमके कोणत्या स्वरुपाचे असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


पूर्वपदावर येणार रोजगार संधीचं चित्र 


अभ्यासकांच्या निरिक्षणानुसार २०१६ मधील नोटाबंदी, १ जुलै २०१७ नंतरची जीएसटी करप्रणाली या साऱ्या घडामोडींनंतर आणि सरत्या वर्षात म्हणजे २०१८ मध्ये अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती पाहता येत्या काळात रोजगार क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. 


ई- कॉमर्स क्षेत्रांमध्ये येत्या वर्षात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असल्याचं कळत आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही केली जाणार असल्याचं अपेक्षा आहे. तेव्हा आता अभ्यासकांकडून वर्तवण्यात आलेला हा अंदाज आणि सरकारची  आर्थिक धोरणं पाहता येतं वर्ष कोणालाठी कितपत फायद्याचं ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.