LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार 80 हजार, बघा तुम्ही या वयोगटात बसता का?
सहाय्यक पदासाठी 33,960 रुपये महिना असा पगार असेल,असिस्टेंट मॅनेजर पदासाठी जवळपास 80 हजार रुपये महिना पगार देण्यात येईल.
LIC HFL Recruitment 2022 Notification: जीवन बीमा निगम (एलआईसी) lichousing.com वर सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन माध्यमांद्वारे मागवले आहेत.ही भरती सेंट्रल, ईस्ट सेंट्रल, ईस्टर्न, नॉर्थ सेंट्रल, नॉर्दन, साउथ सेंट्रल, साउथ ईस्टर्न, साउदर्न एंड वेस्टर्न रीजनसाठी असणार आहे दरम्यान एलआईसी एचएफएल एप्लिकेशन फॉर्मसाठी लिंकसुद्धा इथे उपलब्ध असेल तर ही लिंक 25 ऑगस्ट पर्यंत ऍक्टिव्ह असेल.जे उमेदवार एलआईसी एचएफएल सहायक भर्ती 2022 आणि एलआईसी एचएफएल एएम भर्ती 2022 साठी यशस्वीपणे अर्ज दाखल करतील त्या उमेदवारांना सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022 मध्ये ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावलं जाईल.
LIC HFL महत्वाच्या तारखा
एलआईसी एचएफएल रजिस्ट्रेशन सुरु होण्याची तारीख - 04 ऑगस्ट 2022
एलआईसी एचएफएल रजिस्ट्रेश करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2022
एलआईसी एचएफएल एडमिट कार्डची तारीख - परीक्षेआधी 7 ते 14 दिवस आधी
एलआईसी एचएफएल सहायक परीक्षा तारीख - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022
एलआईसी एचएफएल एएम परीक्षा तारीख - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022
पात्रता (Eligibility Criteria for LIC HFL Recruitment 2022)
असिस्टंट - उमेदवारास पदवी परीक्षेत कमीतकमी 55 टक्क्यांनी उत्तीर्ण होणं गरजेचं असेल
AM - उमेदवार पदवी परीक्षेत 60 टक्के मिळवून उत्तीर्ण झालेला असावा किंवा कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएट असला पाहिजे
AM DME - पदवी परीक्षेत कमीतकमी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण होणं गरजेचं असेल,कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएट असला पाहिजे.मार्केटिंग/फाइनांस मध्ये एमबीए पर्यंतच शिक्षण असेल तर प्राधान्य दिल जाईल
पगार
पगाराविषयी बोलायच झालं तर सहाय्यक पदासाठी 33,960 रुपये महिना असा पगार असेल,असिस्टेंट मॅनेजर पदासाठी जवळपास 80 हजार रुपये महिना पगार देण्यात येईल.
वय
वयाची मर्यादा देखील देण्यात आलेय सहाय्यक पदासाठी 21 वर्ष ते 28 वर्ष अशी वयोमर्यादा आहे,तर सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 21 ते 28 वय असायला हवं तर DME पदासाठीची वयोमर्यादा 21 ते 40 ठेवण्यात आलयं