टेलिकॉम सेक्टरमध्ये हजारो जणांवर बेरोजगारीची टांगती तलवार?
टेलिकॉम सेक्टरमधली खळबळ आता तीव्रतेने समोर येतेय. यंदाच्या वर्षांत टेलिकॉम सेक्टरमध्ये कार्यरत असणाऱ्या जवळपास ३० हजार लोकांना नोकरीतून काढलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
नवी दिल्ली : टेलिकॉम सेक्टरमधली खळबळ आता तीव्रतेने समोर येतेय. यंदाच्या वर्षांत टेलिकॉम सेक्टरमध्ये कार्यरत असणाऱ्या जवळपास ३० हजार लोकांना नोकरीतून काढलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
'टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, प्लेसमेंट फर्म्सना ही स्थिती येत्या वर्षात आणखीन खराब होण्याची शक्यता वाटतेय.
मार्केटमधली स्थिती
- रिलायन्स कम्युनिकेशन्सनं (आरकॉम) आपला वायरलेस बिजनेसचा मोठा भाग बंद करण्याची घोषणा केलीय
- टाटा ग्रुपनं आपला मोबाईल बिझनेस भारती एअरटेलला विकलाय
- टेलिकॉम सेक्टरमधले मोठे बदल या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत
इन्फ्रास्ट्रक्चर, नेटवर्क इंजीनियरिंग, सेल्स - डिस्ट्रीब्यूशन, टेलिकॉम इंजीनियरिंग, ह्युमन रिसोर्स आणि फायनान्स, कॉल सेंटर और सपॉर्ट फंक्शन्स या सगळ्या विभागांतील नोकरदार वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
काहींच्या अभ्यासकांच्या मते, रिलायन्स जिओचे स्वस्तात स्वत टेरिफ ऑफर्समुळे या सेक्टरमधील बिझनेसवर मोठा दबाव निर्माण झालाय तर काहींच्या म्हणण्यानुसार, ही धोकादायक चिन्हं २००८-०९ पासून दिसू लागली होती जेव्हा मोठ्या प्रमाणात टेलिकॉम लायसन्स देण्यात आले होते.