नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शहा मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनणार हे जवळपास निश्चित आहे. पण मंत्री झाल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात भाजपने अनेक ठिकाणी विजयी मिळवला. ते भाजपचे एक यशस्वी अध्यक्ष ठरले आहेत. त्यामुळे आता अमित शहा यांची जागी कोणाला अध्यक्ष करणार याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांना मोदींच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं मंत्रीपद मिळू शकतं. त्यामुळे त्यांच्या जागी जे.पी नड्डा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात अमित शहा हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या नव्या अध्यक्षाची घोषणा होईल.



५९ वर्षाचे जेपी नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात आरोग्य मंत्री होते. नड्डा हे हिमाचल प्रदेशचे आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. तसेच ते भाजपच्य़ा संसदीय बोर्डाचे सचिव देखील आहेत. भाजपची रणनीती आखण्यात देखील त्यांचा मोठा वाटा आहे.