मुंबई : कॉर्पोरेट कंपन्यांनीही देशभरात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने (EVs) खरेदी करण्याची तयारी केली आहे. अलीकडेच एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसने इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपयांचे इंसेटिव देण्याची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉर्पोरेट कंपन्यांनीही देशभरात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने (EVs) खरेदी करण्याची तयारी केली आहे. अलीकडेच एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसने इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपयांचे इंसेटिव देण्याची घोषणा केली आहे.


JSW समूहाकडून कर्मचाऱ्यांना 3 लाखांचे इंसेटिव


देशातील मोठा उद्योग समुह असलेल्या JSW समूहाने जाहीर केले की, कोणत्याही कर्मचार्‍याने इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले तर त्यांना कंपनीकडून 3 लाख रुपयांपर्यंतचे इंसेटिव मिळेल. हा कंपनीच्या JSW इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) धोरणाचा भाग आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.


इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि इलेक्ट्रिक कार अशा दोन्ही प्रकारच्या खरेदीवर कर्मचाऱ्यांना हे इंसेटिव मिळेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. समूह प्रमुख एचआर दिलीप पटनायक यांनी सांगितले की, भारत वाहनांद्वारे कार्बन उत्सर्जन करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. दुसरीकडे, सामान्य पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने अधिक कार्यक्षम आहेत. अशा परिस्थितीत कंपनी जानेवारी 2022 पासून आपली ईव्ही पॉलिसी लागू करणार आहे.


मोफत चार्जिंग सुविधा देखील उपलब्ध 


कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचे कर्मचारी देशभरातील कंपनीच्या सर्व कार्यालये आणि कारखान्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने मोफत चार्ज करू शकतील. यासाठी कंपनी या सर्व ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे जाळे तयार करणार असून पार्किंगमध्ये स्पेशल ग्रीन झोनही तयार करणार आहे.