बिहार : भारतात कौशल्याची आणि जुगाडाची काही कमी नाही. कोरोना काळात तर वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड लोकांनी केले आणि ते तुफान व्हायरल देखील झाले आहेत. एका पठ्ठ्यानं तर चक्क कारलाच हेलिकॉप्टरचं रुप दिलं आहे. त्याचा हा आगळावेगळा जुगाड सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सध्या लग्नाचा मुहूर्त आहे. लग्नात पाठवणीच्या वेळी वडील आपल्या मुलीसाठी काही ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवत असल्याचे काही व्हिडीओ देखील चर्चेत आले होते. मात्र प्रत्येकाच्या खिशाला हेलिकॉप्टर घेणं परवडणार नाही. या सगळ्याचा विचार करून तरुणानं चक्क कारलाच हेलिकॉप्टर बनवलं आहे. त्याच्या या जुगाडाचं कौतुक होतं आहे. 


या तरुणानं टाट नॅनो कारला चक्क हेलिकॉप्टरचं रुप दिलं आहे. त्याच्या या जुगाडचं कौतुक बिहारच नाही तर जगभरात होत आहे. त्याचं हे हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी तब्बल 19 जणांनी बुकिंग केलं आहे. 


वधूसाठी नवरदेव करतायत या हेलिकॉप्टरचं बुकिंग


मीडिया रिपोर्टनुसार बिहारच्या बगहा इथे राहणाऱ्या गुड्डू शर्मा यांनी 2 लाख रुपये खर्च करून नॅनो कारचं हेलिकॉप्टरमध्ये रुपांतर केलं. गुड्डू यांनी आपलं पूर्ण वाहन तयार करण्यासाठी सेंसरचा वापर केला. त्यांचा हा सकारात्मक आविष्कार पहिल्यांदा खूप जास्त हिट झाला. 19 लोकांनी त्यांच्याकडे बुकिंग देखील केलं आहे. 



हेलिकॉप्टरमधून सफर करण्यासाठी मोजावे लागणार एवढे पैसे


तुम्हाला जर या हॅलिकॉप्टरमधून प्रवास करायचा असेल तर 15 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. कारला हेलिकॉप्टरचं रुप देणारा ह्या गुड्डू शर्माचं खूप कौतुक होत आहे. हे आत्मनिर्भर भारताचं जिवंत उदा: असल्याची चर्चा आहे. त्याला हे हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी दीड लाख रुपयांचा खर्च आला. प्रति ट्रिपसाठी 15 हजार रुपये भाडं या हेलिकॉप्टरचं असणार आहे. 


लग्नात हेलिकॉप्टरची हौस आता पूर्ण करता येणार आहे. याचं कारण म्हणजे गुड्डू यांना टाटा नॅनो कारचं हेलिकॉप्टरमध्ये रुपांतर केलं आहे. या हेलिकॉप्टरची चर्चा फक्त बिहारमध्येच नाही तर जगभरात होत आहे.