मुंबई : आज २१ डिसेंबर रोजी गुरू आणि शनिची महायुती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अवकाशात खगोलशास्त्रातील सर्वात मोठी घटना अनुभवता येणार आहे. खगोल प्रेमींकरता हा अद्भुत नजरणा असणार आहे. २०२० मधील ही सर्वात मोठी खगोलीय घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८०० वर्षांनंतर गुरू-शनिची महायुती होणार आहे. दोन्ही ग्रहांमधील अंतर ०.१ अंशांवर येणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता हा विलोभनीय दृश्य पाहता येणार आहेत. या अगोदर १६२३ साली हे दोन ग्रह एकत्र आहे होते. महायुतीची अनुभूती घेण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. ही महायुती राजकीय पक्षांची नसून सुर्यमालेतील सर्वात मोठ्या आकारांच्या ग्रहांची आहे. सोमवारी म्हणजे २१ डिसेंबरला संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पश्चिम क्षितीजावर गुरु आणि शनी या दोन ग्रहांची महायुती बघायला मिळणार आहे. आकाशातील युती म्हणजे दोन ग्रह किंवा तारे हे आकाशात जवळ दिसणं. 


गुरु ग्रहाला सुर्याभोवती फिरायला सुमारे ११ वर्ष ८ महिने लागतात. तर शनी ग्रहाला सुर्याभोवती एक प्रदक्षणा पुर्ण करायला तब्बल २९ वर्ष सहा महिने लागतात. पृथ्वी ही सुर्यापासून सुमारे १५ कोटी किलोमीटर अंतरावर आहे.  गुरु ग्रह हा सुमारे ७७ कोटी किलोमीटर तर शनी ग्रह हा सुर्यापासून सुमारे १४३ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. 



साधारण दर २० वर्षांनी गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह सुर्याभोवती प्रदक्षणा घालतांना एकमेकांच्या जवळ येतात, आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर २० वर्षांनी सुर्याभोवती फिरतांना दोन्ही ग्रह काही काळ समांतर प्रवास करतात. या काळांत गुरु आणि शनी यामध्ये सुमारे ७० कोटी किलोमीटर एवढे अंतर असते, आताही महायुतीच्या वेळी साधारण तेवढेच अंतर असणार आहे.