मुंबई : मध्यमवर्गीय कुटुंबात प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते, ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा पूरेपूर फायदा घेतला जातो. ज्यामुळे कोणतीही गोष्ट वाया जात नाही. वापरलेल्या टूथब्रशपासून ते फाटलेल्या कपड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींचा अगदी तो संपेपर्यंत वापर केला जातो. म्हणजेच काय, तर एकच गोष्टी अगदी संपेपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी वापली जातेय यासंबंधीत अनेक मीम्स सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेले तुम्ही एकले असेल. एवढंच काय तर स्टँडअप कॉमेडी करणारे लोक देखील यावर अनेक जोक पास करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु पैशांची किंमत ही मीडल क्लास लोकांना चांगलंच माहित असतं, त्यामुळे ते कधीही कोणत्याही गोष्टींना वाया घालवत नाहीत.


यासंदर्भात काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. चला जाणून घेऊ या.


बहुतेक मध्यमवर्गीय घरांच्या शौचालयात शून्य वॅटचा बल्ब असतो. यामागची लोकांची मानसिकता अशी आहे की वॉशरूममध्ये जास्त प्रकाशाची गरज नाही, त्यामुळे लोक वीज वाचवण्यासाठी ही युक्ती वापरतात.



सोशल मीडियावर दिवसभर ऍक्टिव्ह असणारे लोक मध्यमवर्गीय घरांचे काही फोटो अपलोड करत राहतात, जे प्रत्येकाच्या घरात सारखेच असतात. प्रत्येक भारतीय मध्यमवर्गीय घरात अशी रचना असलेला चमचा असतो. सोशल मीडियावर असे फोटो टाकून लोक विचारत आहेत की, कोणाच्या घरात असे चमचे आहेत.



मध्यमवर्गीय घरांमध्ये जेव्हा तुम्ही फ्रीज उघडता तेव्हा एका भांड्यात बर्फ गोठलेला दिसतो, हे लोक बर्फ गोठवण्यासाठी बर्फाच्या ट्रेचा वापर करत नाहीत. ट्रेमध्ये बर्फ कमी गोठतो आणि फ्रीजची जास्त जागा व्यापली जाते, अशी यामागची लोकांची मानसिकता आहे.



आजही तुम्ही मध्यमवर्गीय भारतीय घरात गेलात तर अशी रंगीबेरंगी टाईल्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. विशेषत: 90 किंवा त्यापूर्वीचे लोका अशी टाईल्स लावायचे.



BMW ची किंमत वाढली किंवा AUDI किंवा नवा फोन लॉन्च झाला तरी त्यांना काही फरक पडत नाही. भारतीय माता नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत टूथब्रश वापरतात हे तुम्ही बहुतेक घरांमध्ये पाहिले असेल. एवढंच काय तर ब्रश खराब झाला तरी तो फेकून दिला जात नाही, त्याच्याने केसांना मेहंदी लावली जाते, तसेच त्याचा वापर पंखा किंवा इतर वस्तु साफ करण्यासाठी केला जाते.



असंच काहीसं ते टुथपेस्ट सोबत देखील करतात. टुथपेस्ट संपली तरी देखील लोक त्याला फेकून देत नाहीत तर लाटणीच्या सह्याने कॉलगेट काढले जाते किंवा कातरीने ते कापून पुढचे दोन दिवस ती वापरली जाते.