नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती जस्टिस चेलमेश्वर येत्या 22 जून रोजी सेवानिवत्त होत आहेत. याच निमित्तानं त्यांच्या सन्मानार्थ 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननं आयोजित केलेल्या निरोप समारंभाचं निमंत्रण स्वीकारण्यास मात्र त्यांनी नकार दिलाय. न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना व्यक्तीगत कारणं देत त्यांचं हे निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली 12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या चार ज्येष्ठ न्यायाधिशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर आरोप करत घेतेल्या पत्रकार परिषदेनंतर वादात सापडले आहेत. या पत्रकार परिषदेत न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनीही सहभाग घेतला. 


सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जस्टिस चेलमेश्वर यांना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी 18 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात सहभागी होण्यास नकार दिला. कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु होण्याआणधी 18 मे अंतिम कामाचा दिवस आहे. चेलमेश्वर यांनी नकार दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पुन्हा एका त्यांना या सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती केली. परंतु, व्यक्तिगत कारणं देत त्यांनी या समारंभाला उपस्थिती लावण्यास असहमती दर्शवली.