...तर आज परिस्थिती वेगळी असती, ज्योतिरादित्य सिंधिया यांचं राहुल गांधींना उत्तर
भाजपचे राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiradiya Sindhiya) कॉंग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, पण ते भाजपमध्ये बॅकबेंचर म्हणून राहिले आहेत. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आता स्वत: भाजपचे राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. सिंधिया म्हणाले की, 'आज राहुल गांधी ज्या प्रकारे चिंतित आहेत, त्याचप्रमाणे मी जेव्हा कॉंग्रेसमध्ये होतो त्यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली असती तर आज परिस्थिती वेगळी असते.' (Jyotiraditya Sindhiya answer To rahul Gandhi)
सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी राहुल गांधी म्हणाले की, ज्योतिरादित्य सिंधिया कॉंग्रेसमध्ये असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, पण ते बॅकबेंचर झाले आहेत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करून संघटना मजबूत करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. मी त्यांना सांगितले की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. पण त्यांनी दुसरा मार्ग निवडला.'
राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले, की तेथे कधीच ते मुख्यमंत्री होणार नाहीत. यासाठी त्यांना येथे परत यावे लागेल.' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी विरुद्ध लढा द्या. कोणाची भीती बाळगू नका अशा सूचना देखील त्यांनी पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना दिल्या.
गेल्या वर्षी मार्चमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर कॉंग्रेस सोडली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांच्या समर्थकांनी देखील पक्ष सोडला, ज्यामुळे कॉंग्रेसचे सरकार पडले. ते जवळपास 18 वर्षे कॉंग्रेसमध्ये राहिले. यावेळी त्यांनी पक्षासाठी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधिया राज्यसभेचे सदस्य झाले.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, 'जे दोन वर्षांत कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकले नाहीत ते मुख्यमंत्री बनविण्याबद्दल बोलत आहेत.'