नवी दिल्ली : कैलास मानसरोवर यात्रेसाठी पहिली तुकडी रवाना झालीय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हिरवा झेंडा दाखवून 58 यात्रेकरुंच्या तुकडीला रवाना केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या यात्रेसाठी चार हजार भाविकांचे अर्ज आले होते. त्यापैकी लॉटरी पद्धतीने साठ जणांची निवड करण्यात आली होती. 


मात्र दोन भाविक आरोग्य तपासणी चाचणीत अपयशी ठरले. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत मानसरोवर यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. दोन वेगवेगळ्या मार्गाने जाणारी ही यात्रा पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी लागतो.