चेन्नई:  चेन्नईच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर कमल हासन राजकारणात प्रवेश करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दुपारी बाराच्या सुमारास कमल हासन एक मोठी घोषणा करणार असल्याचं बोललं जातंय. कमल हासन यांनी स्वत: ही घोषणा केली असून आम आदमी पक्षाच्या धर्तीवर लोकवर्गणीतून ते स्वत:चा राजकीय पक्ष काढणार आहेत.


आज 7 नोव्हेंबरला कमल हासन यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या  दिवशीच एक मोबाइल अॅप लाँच करणार असून त्याद्वारे चाहत्यांना पाठिंब्याचं आवाहन करणार आहेत. या अॅपच्या माध्यमातूनच ते पक्षनिधी उभारणार आहेत. नव्या पक्षाच्या बांधणीसाठी किमान 30 कोटी रुपयांची गरज लागेल असं त्यांनी म्हटलंय. नव्या पक्षाचं स्वरुप आणि नाव काय असेल हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलंय. 

 कमल हासन यांच्याआधी  जयललिता, चिरंजीवी, पवन कल्याण, सुरेश गोपी आदि दाक्षिणात्य कलाकारांनी राजकारणात प्रवेश केलाय.