Wife Slashes Husbands Private Part: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एका पत्नीने पतीच्या गुप्तांगावर वार करुन त्याला जखमी केलं आहे. या हल्ल्यानंतर पतीने एका आठवड्याने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पत्नीने गुप्तांगावर वार केल्याचं पोलिसांना कसं सांगावं यासंदर्भात लाज वाटत असल्याने या व्यक्तीने घटना घडल्यानंतर एक आठवडा पत्नीविरोधात तक्रार दाखल केली नव्हती. हा सर्व प्रकार कानपूर शहरातील गुजैनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.


कोणलाही सांगितलं नाही कारण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरमधील बर्रा परिसरात राहणाऱ्या राजूने (बदलेलं नाव) दिलेल्या माहितीनुसार 14 जून रोजी त्याचं पत्नीबरोबर काही कारणाने भांडण झालं. अनेकदा आमचे वाद होतात तसाच हा वाद होता असंही राजूने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं. मात्र वाद घालून नेहमीप्रमाणे रात्री झोपल्यानंतर पत्नीने राजूवर हल्ला केला. पत्नीने राजूच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. झोपेत असलेल्या राजूला अचानक जाग आली आणि वेदना होऊ लागल्याने तो विव्हळू लागला. त्याचा आरडाओरड ऐकून पत्नीने घरातून पळ काढला. आपल्याच पत्नीने आपल्या गुप्तांवर वार केल्याचं सांगायला लाज वाटत असल्याने आठवडाभर तक्रार करण्यासाठी आलो नाही असंही त्याने पोलिसांना सांगितलं. आपण या हल्ल्यासंदर्भात कोणालाच काहीही सांगितलेलं नाही असंही राजू म्हणाला. गुजैनी पोलिसांनी या प्रकरणामध्ये राजूच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. 


पत्नीचा शोध सुरु


पोलीस निरीक्षक अभिषेक पांडे यांनी या संदर्भात माहिती देताना फरार महिलेचा शोध पोलीस घेत असल्याचं सांगितलं. पीडित व्यक्तीच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. लवकरच आरोपी महिलेला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.


पतीच्या गुप्तांगावर ओतलं उकळतं तेल


काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील ग्वालियरमध्येही अशीच घटना घडली होती. येथील एका व्यक्तीने रागाच्याभरात आपल्या पत्नीचा मोबाईल खेचला. त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या पत्नीने पतीच्या गुप्तांगावर उकळतं तेल टाकून घरातून पळ काढला. या व्यक्तीच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोकांनी त्याच्या घरी धाव घेतली. तोपर्यंत पत्नीने घरातून पळ काढला होता आणि पती जमीनीवर विव्हळत पडला होता. शेजाऱ्यांनी या व्यक्तीला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयामध्ये डिस्चार्ज मिळाल्यानंतर या व्यक्तीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. पत्नी अनेक दिवस सातत्याने मोबाईलवरुन शेजाऱ्याशी बोलायची. याचाच पतीला राग आल्याने त्याने मोबाईल खेचला होता. त्यावरुन त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.