मुंबई: पाकिस्तानातील तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान १८ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी माजी क्रिकेटपटू कपिल देव, नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील गावसकर यांनी निमंत्रण देण्यात आलंय. मात्र या शपथविधीला जाणार नसल्याचं सुनील गावस्कर यांनी सांगितलंय. कसोटी मालिकेतील समालोचन करण्यास व्यस्त असल्याचं कारण त्यांनी पुढे केलंय. 


'भारत-पाक संबंध सुधारणार'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये सत्ता पालट झाला.  क्रिकेट मैदान गाजविलेल्या इम्रान खानच्या राजकीय पक्षाने ११८ सर्वाधिक जागा जिंकत सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे इम्रान खान पंतप्रधान होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना इम्रान खाननं भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार असल्याचं सांगतिले. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा दोन्ही देशांमध्ये जास्तीत व्यापारी संबंधांवर भर देणार असल्याचं म्हटलेय.


'दिलेली आश्वासने पाळणार'


निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पाळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. १९९६ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली. आता आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. जिनांच्या स्वप्नातील पाकिस्तान प्रत्यक्षात आणायचा आहे. हे माझं स्वप्नं आहे. भारताशी सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहोत. भारत-पाकिस्तान यांच्यातला व्यापार हा दोन्ही देशांसाठी फायद्याचा ठरेल, असे ते म्हणालेत.