नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयक्तांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक निवडणूक तारखांची घोषणा केलीय. आजपासून कर्नाटकात निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आलीय. 


महत्त्वाच्या तारखा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - २५ एप्रिल २०१८


- अर्ज मागे घेण्याची तारीख - २७ एप्रिल २०१८


- मतदानाची तारीख - १२ मे २०१८


- मतमोजणीची तारीख - १८ मे २०१८


निवडणूक आयोगाच्या आणखी महत्त्वाच्या घोषणा


- संपूर्ण राज्यात २२४ जागांवर एकाच टप्प्यात होणार निवडणूक


- कर्नाटकात आजपासून आचारसंहिता लागू


- सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करणार - निवडणूक आयोग


- मीडियात परवानगीशिवाय जाहिराती नाही - निवडणूक आयोगाचे आदेश 


५६ हजारांहून अधिक मतदान केंद्र 


या ठिकाणी चार कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी ५६ हजारांहून अधिक मतदान केंद्र उभारणार असल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे.


कर्नाटक निवडणुकीत जातीय समीकरणंही महत्त्वाची भूमिका बजावणार असं दिसतंय. सध्या दलित १९ टक्के, मुस्लिम १६ टक्के, मागासवर्गीय १६ टक्के, लिंगायत १७ टक्के तर वोक्कालिगा ११ टक्के मतदार कर्नाटकात आहेत.


दोन महिने आधीच निवडणुका


मे महिन्याच्या २८ तारखेला विधानसभेची मुदत संपत असली, तरी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास दोन महिने आधीच जाहीर होणार आहे. राज्यातल्या निवडणूक प्रचाराला आधीच रंग चढलाय.


राज्यातील २२४ विधानसभा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. २०१३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण २२४ जागांपैंकी १२२ जागा काँग्रेसकडे तर भाजपच्या खात्यात ४० गेल्या होत्या. तर भाजपशी काडीमोड घेणाऱ्या बीएस येडियुरप्पा यांच्या खात्यात केवळ ६ जागा आल्या होत्या.