मुंबई : कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही विश्वासमत सिद्ध करताना भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यामुळे देशभरातून भाजप तसेच, भाजपच्या प्रादेशीक आणि केंद्रीय नेतृत्वावर टीकेची झोड उठवली जात आहे. ही टीका करताना देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अशा काही नेत्यांच्या प्रतिक्रिया...


नरेंद्र मोदींचा मुखवटा फाटला - राहुल गांधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक राज्यातलं भाजपचं तीन दिवसांचं सरकार कोसळल्यानंतर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या खरेदीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही त्यांनी केला. भ्रष्टाचाराविरोधात ओरडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा यामुळे फाटल्याची टीकाही त्यांनी केली. तर पंजाबनंतर काँग्रेसचा हा दुसरा विजय असल्याचं राहुल गांधी यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांतही सर्व विरोधकांना एकत्र घेऊन भाजपला हरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याद्वारे व्यापक आघाडीचे संकेतच राहुल गांधींनी दिले.


कर्नाटकचा पराभव भाजपला मोठा धक्का - मायावती


कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात भाजपला आलेलं अपयश, हा भाजपसाठी फार मोठा धक्का आहे अशी प्रतिक्रिया, बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी दिलीय. 


कर्नाटकात भाजपकडून घोडेबाजाराचा प्रयत्न - तेजस्वी यादव


कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून घोडेबाजाराचा प्रयत्न झाला. याकरता संबंधितांवर कारवाईची मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते, तेजस्वी यादव यांनी केलीय. 


राहुल गांधी यांचा दावा हस्यास्पद - प्रकाश जावडेकर


भाजपला हरवल्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा दावा हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया,  केंद्रीय मंत्री आणि भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी दिलीय. काँग्रेसकडूनच संसदीय नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप जावडेकरांनी केला. एकेकाळी एकमेकांना शिव्या घालणारेच एकत्र आलेले कर्नाटकमध्ये पाहायला मिळाल्याचंही ते म्हणाले.