नवी दिल्ली : कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या १० बंडखोर आमदारांना मोठा झटका बसला आहे. त्यांना आज संध्याकाळपर्यंत विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षांना आजच राजीनाम्याबाबत निर्णय घ्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. राजीनामा देत बंडखोरी केलेल्या आमदारांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात राजीनामे स्विकरण्याबाबत याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. तसेच राजीनामा दिलेल्या आमदारांना डीजीपी यांनी सुरक्षा द्यावी, असेही बजावले आहे.


कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जेडीएस-काँग्रेस सरकारला मोठा झटका बसला आहे. कारण आजच राजीनाम्यावर निर्णय घेण्यास बजावण्यात आले आहे. त्यामुळे राजीनामा दिलेले बंडखोर आमदारांना हा एक दिलासा आहे. मात्र, त्यांना अध्यक्षांसमोर उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा मुंबईतील हॉटेलमधील मुक्काम आता हलवावा लागणार आहे. आज कोणत्याही परिस्थिती त्यांना विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहावे लागणार आहे.