बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय.  संध्याकाळी  पाच वाजेपर्यंत ६४ टक्के मतदान पार पडलंय... त्यामुळे सहा वाजेपर्यंत हा आकडा सरासरी सत्तर टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदानापेक्षा यंदा जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरुन ढवळून निघालेल्या कर्नाटकची जनता कुणाला कौर देणार? याचीच आता साऱ्या देशाला उत्सुकता लागलीय. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या एकूण २२२ जागांसाठी  मतदान होतंय. दरम्यान, मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक 'महाएक्झिट पोल' जाहीर झालेत... या 'एक्झिट पोल'मध्ये काँग्रेस पुढे असल्याचं दिसून येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू अवस्था दिसेल, असं भाकीत वर्तवण्यात आलंय. कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल मिळालेला नाही. सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे जातील, असंही एक्झिट पोल सांगत आहेत. हाती आलेल्या दोन एक्झिट पोलमध्ये भाजपा पुढे दिसतेय तर तीन एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पुढे दिसतेय. 


काय सांगतायत 'एक्झिट पोल' 


टाईम्स नाऊ - व्हीएमआर


काँग्रेस : ९० - १०३


भाजप : ८० - ९३


जेडीएस : ३१ - ३९


इतर : २ - ४


 


आज तक


काँग्रेस : १०६ - ११८


भाजप : ७९ - ९२


जेडीएस : २२ - ३०


इतर : ००


 


रिपब्लिक टीव्ही


काँग्रेस : ९५ - ११४


भाजप : ७३ - ८२


जेडीएस : ३२ - ४३


इतर : २ - ३


 


इंडिया टीव्ही


काँग्रेस : ८७


भाजप : ९७


जेडीएस : ३५


इतर : ००


 


एबीपी - सी व्होटर


काँग्रेस : ९९ - १०९


भाजप : ८७ - ९९


जेडीएस : २१ - ३०


इतर : १ - ८


 


महाएक्झिट पोल

विजयाचा दावा... 


दरम्यान, सर्वच पक्षांनी आपल्या विजयचा दावा केलाय. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडियुप्पांनी मतदानानंतर विजय त्यांचाच होईल असं म्हटलं. शिवाय १६ मे रोजी आम्ही दिल्लीत जाऊ. सिद्धरामय्यांना आम्ही शपथविधीला बोलावू असंही म्हटलं. येडियुरप्पांचं मानसिक संतुलन बिघडल्यानं ते काहीबाही बरळत आहेत, काँगेस स्पष्ट बहुमतासह पुन्हा सत्तेत येईल असं काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी म्हटलंय. तर जनतादल सेक्युलरचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी रामनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस आणि भाजपच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचारला कर्नाटकची जनता बळी पडणार नाही,असं कुमारस्वामीनी म्हटलंय.