मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला प्रत्यक्ष सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती यायला सुरूवात झाली आहे. मतमोजणी सुरू होऊन काहीच अवधी झाला आहे. त्यामुळे प्राथमिक कल पुढे येत असून, हा कल पाहता काँग्रेस सध्या आघाडीवर आहे. काँग्रेसनची चांगली सुरूवात असून, काँग्रेस सध्या ३३ जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप केवळ २८ जागांवर आघडीवर आहे. तर, जेडीएस १० जागांवर आघडीवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  आजच्या निकालाचे ताजे अपडेट आपणही जाणून घेऊ शकता. निकालाचे ताजे अपडेट आपल्याला  http://zeenews.india.com/marathi/live  पाहता येतील. तसेच, भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट election commission of india ला सुद्धा आपण भेट देऊ शकता.


२०१९ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज (१५ मे, मंगळवार) निकाल लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपसाठी केलेला झंजावती प्रचार आणि त्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेले तोडीस तोड प्रत्त्युत्तर यांमुळे ही निवडणूक प्रचंड गाजली. या निवडणूकीत प्रादेशिक, राष्ट्रीय ते काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय अशा सर्व मुद्द्यांचा दोन्ही पक्षांकडून वापर करण्यात आला. त्यात कर्नाटकचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता कोणत्याही पक्षाला सत्तेत सातत्य ठेवता आले नाही. म्हणजेच कर्नाटकच्या जनतेने राजकीय पक्षांना आलटूनपालटून सत्ता दिली आहे. त्यामुळे या वेळी कर्नाटकची जनता कोणाला हात देते हे पाहणेही मोठे उत्सुकतेचे आहे. त्यात २०१४ नंतर देशभरातील राज्यांमध्ये भाजपचा विजययी वारू पाहता हीच कामगिरी कर्नाटकमध्येही दिसणार का? की इतिहास पुसत काँग्रेस पुन्हा एकदा कर्नाटकवर निर्विवाद सत्ता प्रस्तापित करणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.