कानडी कौल : सट्टाबाजारात कुणावर लागलाय सर्वांत जास्त भाव...
सरकार बनवण्यासाठी भाजपला तिसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागेल. हा तिसरा पक्ष म्हणजे जेडीएस असू शकतो.
नवी दिल्ली : थोड्याच वेळात कर्नाटक निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. कर्नाटकात यंदा मोदींची जादू दिसणार की नागरिक पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास दाखवणार? हे काही वेळातच स्पष्ट होईल. परंतु, निवडणूक आयोगाकडून आकडे जाहीर होण्याअगोदरच सट्टाबाजारात जोरदार चढाओढ सुरू आहे. इतकंच काय तर कोणता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापन करणार? याचं भाकीतही सट्टाबाजारात जाहीर झालंय. सट्टेबाजांनी सर्वात जास्त बोली लावलीय ती भारतीय जनता पार्टीवर... असं असलं तरी सरकार बनवण्यासाठी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाजा लावला जातोय. सरकार बनवण्यासाठी भाजपला तिसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागेल. हा तिसरा पक्ष म्हणजे जेडीएस असू शकतो. अशावेळी जेडीएसची भूमिका महत्त्वाची असेल, असंही सट्टेबाजांचं म्हणणं आहे.
महत्त्वाचा निकाल...
२०१९ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज (१५ मे, मंगळवार) निकाल लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपसाठी केलेला झंजावती प्रचार आणि त्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेले तोडीस तोड प्रत्त्युत्तर यांमुळे ही निवडणूक प्रचंड गाजली. या निवडणूकीत प्रादेशिक, राष्ट्रीय ते काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय अशा सर्व मुद्द्यांचा दोन्ही पक्षांकडून वापर करण्यात आला. त्यात कर्नाटकचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता कोणत्याही पक्षाला सत्तेत सातत्य ठेवता आले नाही. म्हणजेच कर्नाटकच्या जनतेने राजकीय पक्षांना आलटूनपालटून सत्ता दिली आहे. त्यामुळे या वेळी कर्नाटकची जनता कोणाला हात देते हे पाहणेही मोठे उत्सुकतेचे आहे. त्यात २०१४ नंतर देशभरातील राज्यांमध्ये भाजपचा विजययी वारू पाहता हीच कामगिरी कर्नाटकमध्येही दिसणार का? की इतिहास पुसत काँग्रेस पुन्हा एकदा कर्नाटकवर निर्विवाद सत्ता प्रस्तापित करणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.
कुठे पहाल निकाल?
दरम्यान, आजचया निकालाचे ताजे अपडेट आपणही जाणून घेऊ शकता. निकालाचे ताजे अपडेट आपल्याला http://zeenews.india.com/marathi/live पाहता येतील. तसेच, भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट election commission of india ला सुद्धा आपण भेट देऊ शकता.
निकालाला प्रचंड महत्त्व
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निडणूकीसाठी या वेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दोन्ही पक्षांनी आपाले केडर मैदानात उतरवले होते. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. इतक्या की निवडणूक प्रचाराची पातळी अत्यंत घसरल्याचीही चर्चा झाली. सुरूवातीला काँग्रेस, भाजप पक्षांमध्ये असलेला प्रचाराचा जोष, त्यानंतर मध्येच देवेगौडांच्या पक्षाला आलेले महत्त्व. त्यामुळे त्रिशंकू परिस्थितीन निर्माण झाल्यास सत्तेच्या चाव्या कुणाकडे याबाबत निर्माण झालेली उत्सुकता. या सर्व गोष्टींचा विचार करता कर्नाटकची निवडणूक महत्त्वाची ठरते