बंगळुरू : बस उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात 8 जणांनी जीव गमवला आहे. तर 20 हून अधिक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या बसमध्ये 60 प्रवासी होते. ही धक्कादायक घटना कर्नाटक इथल्या तुमकुर जिल्हातील पावागडा जवळ घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून काही विद्यार्थी देखील प्रवास करत होते. मृत आणि जखमींमध्येही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 


बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.