बंगळुरु : कर्नाटकमध्ये विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले आणि सरकारच्या विरोधात गेले. त्यामुळे या ठरावात कुमारस्वामी सरकारचा पराभव झाल्याने त्यांचे सरकार पडले आहे. ९९ विरुद्ध १०५ मताने काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले. केवळ चार मतांनी कुमारस्वामी यांचे सरकार पडले. बंडखोर आमदारांनी भाजपला साथ दिल्याने कुमारस्वामी सरकारला आपले बहुमत गमवावे लागले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी लवकरच आपला राजीनामा राज्यपालांकडे देणार आहेत. त्यानंतर आता भाजप सत्ता स्थापनेचा दावा करु शकते. मात्र त्यापूर्वीच विधानभवनाच्या बाहेर काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आज आणि उद्या बंगळुरूत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडल्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गेल्या २१ दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे सरकार पडले. बंडखोर १३ आमदारांनी बंड पुकारल्याने कुमारस्वामी सरकारला पाय उतार व्हावे लागले आहे. ९९ विरुद्ध १०५ मताने काँग्रेस-जेडीएस सरकार अल्पमतात आले होते. बंडखोर आमदारांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसचे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे भाजपकडून विश्वासदर्शक ठरावाची मागणी लावून धरण्यात आली होती. विधानसभेचे सभापती के. आर. रमेश कुमार यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुमारस्वामी सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठराव दाखल करण्याचे सांगितले होते. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान प्रक्रीया सुरू झाली होती. विश्वासदर्शक ठरावाआधी कुमारस्वामी यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी आनंदाने तयार असल्याचे म्हटले होते.  


मात्र, मी राज्यातील जनतेची माफी मागतो, असे सांगत सत्तेतून बाजुला होणार, असल्याचे संकेत कुमारस्वामी यांनी दिले होते. काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली म्हणून मला केंद्रामधील सरकारने कोणतीच मदत केलेली नाही. मी जर काही चूक केली असेन तर माझा कान पकडा आणि चांगले केले असेल तर चांगलं म्हणा, असे सागंत माझे सरकार निर्लज्ज सरकार नाही, असे त्यांनी भाषण करताना सांगितले.



विश्वासदर्शक ठरावावर बोलताना कुमारस्वामी म्हणाले, मी शेतकऱ्यांना धोका दिलेला नाही. अर्थसंकल्प मांडताना सिद्धारामय्या यांनी केलेल्या कोणत्याही घोषणा मागे मागे घेण्यात आल्या नाहीत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आम्ही आश्वासन दिले होते, त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसोबत बैठक झाली. त्यासाठीच्या अनुदानालाही मंजुरी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून माहिती मागविली आहे. त्याप्रमाने अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आल्याचे बँकांनी मला सांगितले आहे. 


दरम्यान, भाजपला खूप सत्तेची खूप घाई झाली आहे आहे. आम्ही मतदान करणार आहे, मी पळून जाणाऱ्यांतील नाही. परंतु, चर्चा होवू द्या, लोकांना समजले पाहिजे की मी या भितीने पळून जाणार नाही. मी जिंकेन किंवा पराभूत होईन, मत विभाणी होण्याची मी चिंता करत नाही. मात्र मला बोलू दिले पाहिजे, असे मत कुमारस्वामी यांनी मांडले. त्यानंतर मतदान झाले आणि कुमारस्वामी सरकारला कमी मत पडलीत. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळले.