नवी दिल्ली: काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाटी कर्नाटक हे अत्यंत महत्तवाचे राज्य. या राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ येत्या २८ मे २०१८ला संपत आहे. त्यामुळे या राज्यात निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रमुख लढत ही काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच होत असल्यामुळे या संघर्षावर टाकलेला हा एक कटाक्ष.


केवळ १५० जागांचे भाजपचे लक्ष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे उगाच भलेमोठे लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता भाजपने आपल्या आवाक्यातील लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे. गुजरातमध्ये २२४ जागांसाठी विधानसभा निवडणुका होत आहेत. एकूण २२४ जागांपैकी किमान १५० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. तसेच, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी भाजपने आगोदरच काळजी घेतली आहे. मुख्यमंत्री पदासाठी बी. एस. येडियुरप्पाचा चेहरा पुढे करण्यावर भाजपमध्ये जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.


कर्नाटक काँग्रेसची मदार 8 लाख कार्यकर्त्यांवर


निवडणुका जिंकण्यासाठी भाजप नेहमीच काटेकोर नियोजन करते. त्यामुळे 2014 नंतरचा इतिहास विचारात घेऊन काँग्रेसही सावध पावले टाकताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेसने जवळपास आठ लाख कार्यकर्त्यांची फौज तयार केली असून, ही फौज बुथ लेवलला जाऊन काम करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कर्नाटकातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 28 मे 2018ला समाप्त होत आहे. त्यामुळे येत्या १० फेब्रुवरी पासून काँग्रेस कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. कर्नाटकमध्ये 224 जागांसाठी निवडणुक होत आहे.


सहा महिन्यांपासून मोर्चेबांधणीस सुरूवात


प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, काँग्रेसचे प्रभारी जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकमध्य काँग्रेस गेले सहा महिने काम करत आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघावर काम करत अहोत. आतापर्यंत आम्ही 98 टक्के बूथ लेवलच्या गटाची स्थापना केली आहे. कर्नाटकमध्ये सध्या 54,200 बूथ गट आहेत. ज्यात आम्ही 53,000 बनवले आहेत. प्रत्येक गटात 15 सदस्य असणार आहेत. काँग्रेसने कर्नाटकमध्ये 7 लाख 95 हजार कार्यकर्ते तयार केले आहेत, अशी माहितीही वेणुगोपाल यांनी दिली आहे. 


कर्नाटकात भाजपसमोर कडवे आव्हान


दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजपसाठी गुजरातसारखी स्थिती नाही. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला म्हटले जायचे. तसेच, २०१४ नंतर कॉंग्रेसला भराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गुजरात निवडणुकीपर्यंत कॉंग्रेसचा इतिहास हा पराभवाचाच इतिहास राहिला होता. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर चित्रच पालटले. भलेही गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभव स्विकारावा लागला. पण, कॉंग्रेसचे संख्याबळ वाढले. ज्यामुले भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला मोठा लगाम लागला. दुसरे असे की, कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तसेच, भाजपला नेहमीसारखा अतिअत्मविश्वास ठेऊन चालणार नाही. कारण, कर्नाटकात काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेत नाही. पण, भाजपच्या धुरीणांचे म्हणने असे की, कर्नाटकमध्ये लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल नाराजी आहे.