Rape of Hindu Girl : गेल्या काही दिवसांपासून देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. सातत्याने कठोर कारवाईनंतरही अशा घटना सातत्याने होताना दिसताय. अशातच काही प्रकरणांमध्ये धार्मिक बाजू असल्याचेही समोर येत आहे. कर्नाटकात (karnataka) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर धर्मांतरासाठी ब्लॅकमेल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मांतर विरोधी कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर 13 वर्षांच्या मुलीच्या फोटोसोबत छेडछाड करत ब्लॅकमेल करून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनूस पाशा उर्फ ​​फयाज मोहम्मद असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलीच्या शेजारी राहतो. तर मुलगी ही हिंदू असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीला स्मार्टफोन भेट दिला होता. नंतर तो तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलू लागला. मुलीच्या कुटुंबीयांना स्मार्टफोनची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, एके दिवशी आरोपीने व्हिडिओ कॉलवर मुलीचे काही अश्लील फोटो काढले आणि तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुलीने नकार दिल्यावर, आरोपीने तिचे खाजगी चॅट्स आणि अश्लील फोटो तिच्या कुटुंबाला दाखवेल अशी धमकी देऊ लागला. 8 नोव्हेंबर रोजी कुटुंबीय मुलीला तिच्या आजीकडे सोडून चार दिवसांसाठी शिर्डीला गेले. आरोपीने परिस्थितीचा याचा घेत 10 नोव्हेंबर रोजी मुलीच्या आजीला झोपेच्या गोळ्या खाण्यास भाग पाडले. ती बेशुद्ध पडल्यावर आरोपीने मुलीवर बलात्कार केला.


त्यानंतर मुलीच्या वडिलांनी 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, 12 नोव्हेंबर रोजी शिर्डीहून परतल्यानंतर मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. युनूसने मुलीवर बलात्कार केला आणि तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याने मुलीसमोर इस्लाम स्वीकारण्याची अट घातली. यानंतर मुलीने 18 नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी युनूसविरुद्ध बलात्कार आणि ब्लॅकमेल करण्याचीची तक्रार दाखल केली आणि त्याला अटक करण्यात आली. युनूस आधीच विवाहित असल्याचे पोलिसांनी सांगितले.