बेंगळुरु : कर्नाटकातील पेजावर अधोक्षज मठाचे प्रमुख विश्वेश तीर्थ स्वामी यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कर्नाटकात शोक व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी विश्वेश तीर्थ स्वामींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. तर पंतप्रधानांनीही त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्वैत तत्वज्ञानाच्या पेजावर मठाचे ते ३२वे प्रमुख होते. गेल्या काही दिवसांपासून ते श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारत होत नव्हती. स्वामींच्या इच्छेनुसार त्यांना रविवारी सकाळी मठात परत आणण्यात आले. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


पेजावर मठाचे प्रमुख विश्वेश तीर्थ स्वामी यांच्या निधनानंतर राज्य सरकारने २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत तीन दिवसीय शोक जाहीर केला आहे.





१९३१ मध्ये जन्मलेले श्री विश्वेश तीर्थ यांनी वयाच्या ८व्या वर्षी संन्यास घेतला. धर्माबरोबरच, ते राजकीय परिस्थितीवर चर्चेसाठी प्रख्यात होते. एकीकडे पेजावर स्वामी सनातन धर्माचे भक्त होते. तर दुसरीकडे रमजानच्या दिवसांत, मुस्लिम वर्गातील मठात इफ्तार आयोजित करत ते धार्मिक सौहार्दही दाखवत असत.