बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीए अध्यक्ष सोनिया गांधींची आज कर्नाटकच्या विजयापूरमध्ये सभा होतेय,  कर्नाटकच्या प्रचाराचे अवघे तीन दिवस राहिलेत, त्यामुळे या तीन दिवसांत कर्नाटकात जोरदार रणसंग्राम रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकमध्ये तीन सभा घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता विजयपुरामध्ये मोदींची पहिली सभा होणार आहे. तर विजयपुरामध्येच सोनिया गांधींची दुपारी तीनच्या सुमाराला सभा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनिया गांधी यांची कर्नाटकात दीड वर्षांनी सोनिया गांधींची रॅली होतेय. विजयापूरमधल्या सभेनंतर दुपारी दोन वाजता कोपलमध्ये आणि साडे चार वाजता बंगळुरूमध्ये मोदींची सभा होणार आहे. तर राहुल गांधींची आज बिदनूर, चिक्का बल्लापुर, टुमकुर आणि टिपटुरमध्ये सभा होणार आहे. १२ मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे. तर १५ मे रोजी निकाल लागणार आहे.