कर्नाटकातील (Karnataka) सर्पदंशाचा (snakebite) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (soial media) व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने नाग (King cobra) पकडलेला दिसत आहे. तो सापाच्या डोक्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. पण साप अचानक वळतो आणि त्या व्यक्तीला चावतो. (Karnataka Shivamogga man try to kiss king cobra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील (Karnataka) शिवमोग्गा (Shivamogga) येथे नागाचे चुंबन घेताना एका सर्पमित्राने स्टंट करण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य त्यांना चांगलेच महागात पडले. नागाने (snake) त्याच्या ओठांवर चावा घेतला. अॅलेक्स आणि रॉनी हे सर्पमित्र नाग पकडून जंगलात सोडतात. बुधवारीही त्यांनी तसा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान त्याने नागासोबत धोकादायक स्टंट करण्यास सुरुवात केली. हे दोघेही भद्रावतीच्या (Bommanakatte) बोम्मनकट्टे गावाजवळ एका लग्नाच्या घरात दोन साप पकडण्यासाठी पोहोचले होते.


सापाला पकडल्यानंतर अॅलेक्सने नागाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पण नागाने त्याच्या ओठाला चावा घेतला. त्यानंतर अॅलेक्सला शिवमोग्गा येथील मॅकगन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


नागाने चावल्यानंतरही अॅलेक्सने सापांना जंगलात सोडले. चांगली बातमी अशी आहे की अॅलेक्स आता व्यवस्थित आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.



हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करतात, असे काही युजर्सने म्हटलं आहे. तर काही युजर्सनी आतापर्यंतचे सर्वोत्तम लिप-टू-लिप किस आहे असंही म्हटलं आहे.