पणजी, गोवा : भारतातले पहिले प्रीमियम क्रूझ आज गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर दाखल झाले. समुद्राच्या या प्रदेशात जेलेशचा एखाद्या महाराजासारखा थाट होता. ही जलेश. अर्थात कर्णिका. हे जहाज गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर थांबले आणि गोवेकरांची पावले कुतूहलाने जलेशकडे वळली. एक दिवसाआड हे जहाज मुंबई-गोवा आणि गोवा-मुंबई अशा फेऱ्या मारते. मुंबईमधून बॅलार्डपिअर इथल्या ग्रीन गेटवरुन सुटणारे हे जहाज १२ ते १५ तासांत गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर पोहोचते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जहाजावर राहण्यासाठी ८३८ खोल्या आहेत. स्विमिंग पूल, डिस्को, स्पा यांचीही सोय आहे. जैन लोकांसाठी जैन खाद्यपदार्थ त्याशिवाय अस्सल खवय्यांसाठी खास गोव्याचे मासेही तयार असतात. गोवेकरांना या जहाजावर नुसतं भटकताही येते. झोंबणारा वारा, उसळणाऱ्या लाटा, जलेशवरचे धुंद संगीत. अशा सहवासात जेलेशवरचा हा प्रवास मस्त होऊन जातो. 


या क्रूझच्या माध्यमातून तुम्ही एकदम लक्झरी प्रवास अनुभवू शकता. दोन हजार सातशे लोक एकाच वेळी या अलिशान जहाजावरुन प्रवास करु शकतात. सेव्हन स्टार हॉटेलची सुविधा या जहाजावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जहाजावर भारतीय संस्कृती अनुभवता येते. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासांना त्यांच्या पसंतीचे अन्न पदार्थही उपलब्ध आहेत.


या क्रूझमधून प्रवास करणाऱ्या अनिता माळी सांगतात, येथील अनुभव खूप म जेदार आणि लक्षात राहणारा आहे. या क्रूझवर मी माझा वाढदिवस साजरा केला. तो नेहमी लक्षात राहिले. तसेच आणखी एक प्रवासी दीपक म्हणाले, हा एक माझ्यासाठी चांगला अनुभव आहे. मी पहिल्या प्रिमियम क्रूझचा पहिला प्रवासी असेन. मला मिळालेला प्रवासाचा अनुभव माझ्यासोबत कायम राहिल. मला खूप आनंद मिळाला.