तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन
द्राविडी सूर्यास्त
चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं मंगळवारी सायंकाळच्या सुमारास निधन झालंय. माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे वयाच्या ९४ वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कावेरी रूग्णालयाच्यावतीने मेडिकल बुलेटिन जाहीर केले. यावेळी सांयकाळी ६.१० वाजता करूणानिधी यांचे निधन झाल्याचे कावेरी रूग्णालयाच्यावतीने जाहीर केले.
करुणानिधी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यापासून रुग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, करूणानिधी यांना रूग्णालयात दाखल केल्यापासून राज्यात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात होती. अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या ही केली होती. तसेच २१ जणांना त्यांच्या आजाराचे धक्का बसून त्यांचे निधन झाले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत एकूण ५ वेळा ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. तसेच २७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती.
तामिळ संस्कृती आणि द्रविडी अभिमान यावर द्रमुकची उभारणी झाली. पण हिंदीविरोधी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात ओळख दिली. केवळ सामाजिक कार्यामध्ये समाधान मानणाऱ्या पक्षाला १९५६च्या सुमारास लोकाग्रहास्तव निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरावे लागले. १९६७ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला आणि दोन वर्षातच करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या सरकारने कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना आदी महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा महत्वाचा वाटा उचलला.
प्रकृती अधिक खालावल्याचे वृत्त
काही वेळेपूर्वी त्यांच्या शरीरानं उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं होतं. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य चालू ठेवणे आव्हानात्मक बनत चालले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचे वृत्त समजताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केलेय. दरम्यान, पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय.
एम. करुणानिधी यांची प्रकृती ढासळत चालल्याने त्यांच्या महत्वाच्या अवयवांचे कार्य चालू ठेवणे आव्हानात्मक बनत चालले आहे, असे चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलकडून सांगण्यात आलेय. कावेरी रुग्णालयाबाहेर द्रमुकच्या समर्थकांची गर्दीही वाढत चालली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय. दरम्यान, करुणानिधी यांचा धसका घेतल्याने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याय. काल रात्री हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिनद्वारे करुणानिधींची प्रकृती आणखी खराब झाल्याची बातमी दिल्यानंतर रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी उसळली होती.
द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टालिन यांनी कुटुंबियांसह राज्याचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांची त्यांच्या ग्रीनवेस रोड निवासस्थानी भेट घेतली व त्यांना वडिलाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. द्रमुकचे नेते टीआर बालू, मुरासोली सेल्वम आणि आय पेरीयासामी सुद्धा यावेळी उपस्थित होते.