काशी नगरीचा कायापालट होणार; 1500 कोटींच्या विकास योजनांचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजेच वाराणसीचा दौरा करणार आहेत.
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजेच वाराणसीचा दौरा करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते 1500 कोटींच्या विकास योजनांचे उद्घाटन आणि शिलान्यास होणार आहे.. विकास योजनांच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी जनसभेला संबोधित करतील. साधारण 8 महिन्यानंतर मोदी वाराणसीत येत आहेत.
काशीच्या पुरातन वैभवाची पुनर्स्थापना :
मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी ट्वीट करीत म्हटले आहे की, बाबा विश्वनाथांच्या काशी नगरीत आज पंतप्रधानांच्या हस्ते रस्ते, जल परिवहन, शिक्षण, आरोग्य, पर्यटन इत्यादींशी संबधीत साधारण 1500 कोटींहून अधिकच्या विकासयोजनांचे लोकार्पन आणि शिलान्यास होणार आहे. वाराणसीच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय पंतप्रधानांचे हृदयापासून धन्यवाद
आणखी एका ट्वीटमध्ये योगी अदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, आज पंतप्रधानांतर्फे जपान आणि भारतच्या सहयोगाचे प्रतीक 'रुद्राक्ष' आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटरचे उद्धाटन केले जाणार आहे. काशीच्या पुरातन वैभवाची पुनर्स्थापना करण्याचा संकल्प घेतलेल्या आदरणीय पंतप्रधानांचे हार्दिक धन्यवाद.