जम्मू-कश्मीर: दहशतवादी परतला घरी; आईच्या विनंतीमुळे दहशतवादाला सोडचिठ्ठी
एका तरूण दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. मात्र, आईने विनंती करताच दहशतवादाला सोडचिठ्ठी देत हा तरूण पुन्हा घरी परतला आहे.
श्रीनगर : गोळीबार, बॉम्बस्फोट, दगडफेक आणि नेहमीच दहशतवाद्यांच्या सावटाखाली असलेल्या काश्मिरमधून एक प्रचंड सकारात्मक बातमी येत आहे. येथील एका तरूण दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. मात्र, आईने विनंती करताच दहशतवादाला सोडचिठ्ठी देत हा तरूण पुन्हा घरी परतला आहे.
आईचे प्रेमळ आणि भावनीक अवाहन
काश्मीरच्या खोऱ्यात राहणाऱ्या या तरूणाने शुक्रवारी हा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वसामान्य जीवनाचा पुन्हा एकदा नव्याने श्रीगणेशा केला. जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये डीजीपी वैद्य लिहितीत, 'आपल्या आईने प्रेमळ आणि भावनीक अवाहनानंतर तरूणाने दहशतवादाचा रस्ता सोडला आहे. तो आपल्या घरी परतला आहे. मी या कुटुंबासोबत राहण्याचा आणि आनंदी राहण्यासाठी प्रार्थना करतो.'
युवकाने केली घरवापसी
दरम्यान, २०१७ मध्येही चुकीच्या संगतीलमुळे रस्ता चुकलेल्या युवकाने दहशतवादाचा मार्ग निवडला. मात्र, आपण रस्ता चुकल्याचे ध्यानात येताच दहशतवादाच्या मार्गाचा त्याग करत या युवकाने घरवापसी केली आणि आपला सर्वसामान्य मार्ग निवडला होता. त्यानंतर यंदाही एका युवकाने असा मार्ग निवडल्यामुळे दहशतवादाबाबत जनतेच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे.