काश्मीर : जम्मूजवळील कठुआ बलात्कार प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलंय. या बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या विरोधातच तक्रार दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. साक्षीदारांना धमकावणे, खोटे पुरावे सादर करणे असे आरोप एसआयटीवर आहेत. विशाल जंगोत्रा या आरोपीच्या तीन मित्रांना खोटी साक्ष देण्यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी छळ केल्याचाही गंभीर आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाने सर्व पुराव्यांच्या तपासणीनंतर एसआयटीतल्या सर्व अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचे आदेश दिलेत. ७ नोव्हेंबरपर्यंत हे आदेश अंमलात आणायचे आहेत. २०१८ मध्ये कठुआत एका अल्पवयीन मुलीवर गँगरेप झाला होता. त्यानंतर या मुलीची हत्या करण्यात आली होती.



एसआयटीने विशाल जंगोत्रा या व्यक्तिला हत्येचा आरोपी केला होता. एसआयटीच्या तपासावर झी मीडियाने प्रश्न उपस्थित केले होते. याची न्यायालयाने दखल घेतली होती. त्यानंतर पठाणकोटच्या न्यायालयाने जंगोत्राला निर्दोष सोडलं होतं.