मुंबई : केदारनाथ येथे शंकर भगवानांना भेटायला अनेक नागरीक गर्दी करत असतात. परंतु येथील नैसर्गीक परिस्थीतीमुळे केदारनाथ आणि उत्तराखंड येथे बरेच ऍक्सिडंट किंवा अप्रिय घटना घडल्याचे बऱ्याचदा समोर आलं आहे. रवीवारीच उत्तराखंड येथे बस दरीत पडल्याची घटना समोर आली होती. त्याच आता एक हेलिकॉप्टर लँडींगचा थरारक समोर आला आहे. जो पाहून अनेकांचा श्वास थांबला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


केदारनाथमधील एका हेलिकॉप्टर लँडींगचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. थंबी एव्हिएशन या कंपनीच्या हेलिकॉप्टरने खराब हवामान असतानाही लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र जमिनीवर टच डाऊन होताना हे हेलिकॉप्टर अस्थिर झालं, ज्यामुळे ते 270 अंशांत वळलं. हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही तर, विमान जमिनीवर आपटलं आणि पुन्हा उसळलंही. हे संपूर्ण दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहात आहे.


डीजीसीएच्या नियमांचं उल्लंघन करत हा हेलिकॉप्टर लँडींग झाला असल्याचा संशय आहे. परंतु नशीबाने या लँडिंगच्यावेळी कोणताही प्रवासी जखमी झाला नाही, पण हेलिक़ॉप्टर जमिनीवर आपटून वेगाने वळल्यामुळे प्रवाशांचे प्राण कंठाशी आले होते.