India News : जागतिक अर्थव्यवस्थेवर (world Economy) प्रचंड ताण आल्यामुळं एकिकडे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची सत्र सुरु असतानाच भारतात मात्र चित्र काहीसं वेगळं असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या सकारात्मत आणि संतुलित वेगानं पुढे जात असून, नागरिकांच्या अर्थार्जनासह त्यांच्या खर्चाचा आकडा पाहता हीच बाब सिद्ध होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीयांच्या खात्यात येणारी रक्कम, पगार (Salary), आर्थिक मोबदला किंवा आणखी इतर माध्यमांतून येणारे पैसे देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नेमके कुठे खर्च करत आहेत, कुठे गुंतवत आहेत यासंदर्भात आरबीआय (RBI)नं नुकताच एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार मागील वर्षभरात भारतीयांनी परदेशी पर्यटनावर आणि परदेशात एकूण 31.7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 2.64 लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीयांनी खर्च केलेली ही रक्कम 17 टक्क्यांहून जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. 


भारतीयांनी कुठे खर्च केला सर्वाधिक पैसा? 


आतापर्यंत भारतीयांचा कल परदेशातील शैक्षिक खर्चाकडे दिसून येत होता. पण, गेल्या दोन वर्षांमध्ये मात्र ही परिस्थिती बदलताना दिसली असून, आता देशातील नागरिकांनी परदेशात जाऊन शिक्षणाऐवजी परदेशवारी अर्थात पर्यटन, भटकंतीसाठीच अधिक पैसे खर्च केले असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. तुलनेनं शिक्षणासाठी करण्यात आलेल्या खर्चात मात्र घट झाली. 


भारतीयांना मागील वर्षी 1.42 लाख रुपये परदेशातील भटकंतीसाठी खर्च केले. भारतीय व्यक्तींकडून परदेशातील एकूण खर्चापैकी हे प्रमाण 53.6 टक्के असल्याचं सांगण्यात आलं. तर, त्याआधी हा आकडा 24.5 टक्के इतका असल्याचं सांगण्यात आलं. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पर्यटनावरील खर्चात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, तर शिक्षणासाठीच्या खर्चात सुमारे 33 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली. 


हेसुद्धा वाचा : अद्भूत! धूमकेतूमुळं आकाशात पसरला रहस्यमयी प्रकाश आणि...सेल्फी कॅमेरा सुरु करताच 'या' तरुणीला बसला धक्का


फक्त पर्यटनच नव्हे, तर परदेशात गुंतवणुकीतही भारतीयांनी मोठं आर्थिक योगदान दिल्याचं पाहायला मिळालं. स्थावर मालमत्ता आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे भारतीयांचा कल दिसून आला. याशिवाय परदेशात असलेले नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठीही भारतीयांनी मोठा खर्च केल्याचं पाहायला मिळालं. अधिकृत आकडेवारीनुसार मागील वर्षभरात भारतीयांनी परदेशातील नातेवाईकांना 4.6 अब्ज डॉलरच्या भेटवस्तू दिल्या. या खर्चात आतापर्यंत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. वरील एकंदर आकडेवारी पाहता, भारतीयांचा पैसा नेमका कुठं खर्च होतोय याचं अगदी स्पष्ट चित्रच आरबीआयनं सर्वांसमोर आणलं आहे.