Kerala मध्ये नाव उलटून 21 प्रवाशांचा मृत्यू; घटनास्थळाचा पहिलाच Video समोर
Kerala Boat Tragedy : केरळमध्ये पर्यटकांना नेणारी नाव उलटल्यामुळं एक भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. साधारण 40 प्रवाशांना नेणाऱ्या या नावेतील अनेकजण अद्यापही बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे.
Kerala Boat Tragedy : मृत्यू कधी कोणाला कवटाळेल याची काहीच शाश्वती नाही, याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. जिथं काही कळायच्या आतच प्रवासाच्या निमित्तानं घराबाहेर पडलेल्या जवळपास 21 जणांचा अपघाती मृत्यू ओढावला. केरळच्या मलप्पुरम येते ही भयावह दुर्घटना घडली आणि संपूर्ण देश हळहळला. (Kerala Boat Tragedy house Boat Accident death toll increases watch video )
केरळमधील काळा रविवार...
केरळच्या मलप्पुरममध्ये रविवारी रात्री पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा ओढावला. प्राथमिक माहितीनुसार या नावेमध्ये साधारण 40 हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. यापैकी काहीजण अद्यापही बेपत्ता असल्यामुळं आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळतात बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतलं.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather Forecast Today : आजचा दिवस चक्रिवादळाचा, 'ही' तारीख लक्षात ठेवा ; किनारपट्टी भागांना इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सदर घटनेवर दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकाला आधार देत प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रिजनल फायर रेंज अधिकारी शिजू केके यांनी दिलेल्या माहितीनुसार 'रविवारी रात्री नाव उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 21 मृतदेह पाहण्यातून काढण्यात यश आलं आहे. सध्याच्या घडीला या नावेतील एकूण प्रवाशांचा आकडा समोर आल्यामुळं शोधमोहिम अद्यापही सुरुच आहे. काही मृतदेह चिखलात अडकल्यामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत', असं ते म्हणाले.
केरळ दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रात्रीच तातडीनं आपत्कालीन बैठक बोलवत अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीनं उपचार करत त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले. शिवाय मृतांच्या शवविच्छेदन प्रक्रियेत वेग आणण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.
केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजनय यांनीही मलप्पुरममधील तानुर नाव दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत जिल्हा प्रशासनाला सर्व बराचवार्यांना वेग देण्याचे निर्देश दिले. विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला या सर्व कामांवर कॅबिनेट मंत्री नजर ठेवत असून, वेळोवेळी दुर्घटना पीडितांना मदतही करत आहेत.