चेन्नई: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन अपोलो रूग्णालयात दाखल
प्रकृती अचनाक बिघडल्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चेन्नई : प्रकृती अचनाक बिघडल्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पिनरई विजयन यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र, डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतिवर बारीक लक्ष ठेऊन असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पिनराई विजयन हे सध्या ७२ वर्षांचे आहेत. तसचे, विजयन यांनी शुक्रवारी आदिवासी युवक मधु चिंदकी याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्याच्या गावचा दौरा केला होता. या वेळी मधु चिंदकी याच्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा विश्वास पनराई यांनी चिंदकी कुटुंबियांना दिला. खाण्याचे सामना चोरल्याचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत मधुचा मृत्यू झाला होता.