कन्नूर, केरळ : Kerala Bicycle Boy Accident : एका भयंकर अपघाताची बातमी. एक चिमुकला आपली सायकल घराजवळ फिरवत होता. त्याला वाटलं आपण सायकल रस्त्यावर फिरवावी. म्हणून त्यानं पालकांची नजर चुकवली आणि वेगानं सायकल घेऊन रस्त्यावर गेला. पण, त्याचं सायकलवरचं नियंत्रण सुटलं आणि जे झालं ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल, असं काय घडलं ते तुम्हीच पाहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायकलस्वाराची बाईकला धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाहेर फेकला. मात्र, सायकल बस खाली गेली आणि तिचे दोन तुकडे झालेत. तुम्ही कधीही पाहिला नसेल असा अपघात. या अपघाताने उडवला काळजाचा थरकाप. जगातला सर्वात नशीबवान मुलगा ठरला आहे. जीवावर बेतले होते पण चमत्कारच झाला आणि तो बचावला.


एक पदरी रस्त्यावरून भरधाव गाड्या जात होत्या... वेळ संध्याकाळच्या सुमाराची...सुस्साट वेगानं बाईकस्वार चालला होता...त्याचवेळी बाजूच्या कच्च्या रस्त्यावरून अचानक एक लहान मुलगा सायकलवरून आला आणि बाईकस्वाराला धडकला......


हा सायकलस्वार एवढ्या वेगानं आला की याला ब्रेक दाबायलाही वेळ मिळाला नाही...आणि हा जोरात बाईकस्वाराला जाऊन धडकला... ही धडक एवढी जोरात होती की हा सायकलस्वार मुलगा थेट रस्त्याच्या बाहेर फेकला गेला...



ही घटना एवढ्यावर संपत नाही....तर इथं खऱ्या अर्थानं सुरू होते.....कारण एका क्षणापेक्षाही कमी वेळात मागून भरधाव बस आली आणि याची सायकल बसखाली चिरडली गेली.. या अपघातात एक सेकंद जरी उशीर झाला असता तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही हे दृश्यं पाहून केलाच असेल... पण, इथे चमत्कारच घडला...एवढा मोठा अपघात होऊनही फक्त याच्या हाताला थोडसंच खरचटलं...या चिमुरड्यानं थेट मृत्यूलाच चकवा दिला.


काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना केरळमधल्या कन्नूरमध्ये घडलीय. हा मुलगा थोडक्यात बचावला असला तरी तुम्ही त्याच्याएवढे भाग्यवान ठरालच असे नाही. त्यामुळे गाडी चालवताना खबरदारी घ्या.....