कोझिकोड : दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने आरडा-ओरडा, किंकाळ्यांचा एकच आवाज झाला. रक्ताने भिजलेले कपडे, घाबरुन गेलेल्या रडणाऱ्या बाळांचा आवाज आणि रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने परिसराने हादरवून सोडले. शुक्रवारी सायंकाळी एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या  (Kozhikode) हवाई पट्टीतून खाली कोसळले आणि दरीत पडले. या विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात किमान १८  जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२३ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक नागरिक आणि पोलिस यांच्यासह बचावकर्त्यांनी पावसाच्या दरम्यान जखमी प्रवाशांना विमानामधून बाहेर काढले. मोठा आवाज होत या विमानाचे दोन मोठे तुकडे झाले आणि एका क्षणात काय घडले हे प्रवाशांना समजू शकले नाही. एकदम ओरडण्याचा आवाज ऐकू आला. या अपघातात  को-पायलटअखिलेश कुमार आणि दीपक वसंत साठे या पायलटचा मृत्यू झाला.



दरम्यान, मदत आणि बचावकर्त्यांना चार ते पाच वर्षांची मुले आपल्या आई-वडिलांच्या मांडीवर चिकटून बसताना दिसली आणि प्रवाशांचे सर्व सामान येथे विखुरलेले होते. हे दृश्य मनहेलावून टाकणारे होते. मोठा आवाज ऐकताच स्थानिक लोक मदतीसाठी धावले.



 एका स्थानिक व्यक्तीने सांगितले, तो मोठा आवाज ऐकून विमानतळाच्या दिशेने पळाला. लहान मुले सीट खाली अडकली, बरेच लोक जखमी झाले आणि ते खूप वाईट होते. अंगावर काटा आणणारा तो प्रसंग होता. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. बर्‍याच लोकांचे पाय तुटले होते, माझे हात आणि कपडे जखमींच्या रक्ताने डागालले होते. मोठा आवाज ऐकताच स्थानिक लोक मदतीसाठी धावले.



बचाव कार्यात सहभागी असलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितले की, "जखमी पायलटला कॉकपिट तोडून विमानाबाहेर काढण्यात आले." अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली तेव्हा लोकांनी कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मोटारीने प्रवाशांची वाहतूक सुरु केली.