नवी दिल्ली : केरळमधील शबरीमाला मंदिर (Sabarimala Temple) मल्याळम चिंगम महिन्यात (Malayalam Month Chingam) पाच दिवसांच्या मासिक पूजेसाठी रविवारी खुलं करण्यात आलं आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांच्या प्रवेशावरील बंदी कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिर व्यवस्थापन त्रावणकोर देवस्वओम बोर्डने (Travancore Devaswom Board) दिलेल्या माहितीनुसार, मंदिर 21 ऑगस्टपर्यंत खुलं राहणार असून मंदिरात केवळ पारंपरिक पूजा होणार आहे.



कोरोनामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्रावणकोर देवस्वओम बोर्डने एका प्रसिद्धीपत्रकात सांगतिलं की, 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान ओणम पूजेसाठीही मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. 


 भविकांना येथे येण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे. 16 नोव्हेंबरपासून दोन महिन्यांपर्यंत मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात येतं. त्यावेळी येणाऱ्या भक्तांसाठी हा नियम लागू असेल, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.