केरळ : केरळमधील तरूण-तरूणी सध्या चांगलीच चर्चेत आली आहेत. एकमेकांच्या मांडीवर बसून काढलेले त्यांचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतायत. या व्हायरल फोटोसह लॅपटॉप प्रोटेस्ट (म्हणजेच एकप्रकारचे आंदोलन)  हे नाव सुद्धा कानावर पडतेय. त्यामुळे केरळमधल्या तरूण तरूणी का करतायत लॅपटॉप प्रोटेस्ट? तसेच हे आंदोलन छेडण्यामागचं कारण काय ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकरण काय? 
केरळमधील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग त्रिवेंद्रम (CET) जवळ बस स्टॉप आहे. तिरुअनंतपुरममधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे आवडते हँगआउट स्पॉट्सपैकी एक आहे. त्यामुळे तरूण-तरूणींची या स्पॉटवर तुफान गर्दी करतात. 


परंतु बस स्टॉपवर तरूण-तरूणींच्या मस्ती व चाळ्यांना स्थानिकांना त्रास व्हायचा. त्यामुळे स्थानिकांनी या प्रकरणावर आक्रमक होत पोलिसांकडे अनेकदा तक्रारीही केल्या होत्या.मात्र यावर काही पुढे हालचालीच झाल्या नाहीत. त्यामुळे तरूण-तरूणींच्या या त्रासाला कंटाळत स्थानिकांनी बसस्थानकाच्या बाकाचे तीन भागचं करून टाकले. 


म्हणून आंदोलनाच हत्यार उपसलं 
मुले आणि मुली एकत्र बसू नयेत म्हणून तीन आसनी लांबलचक बेंच प्रत्येकी एका सीटमध्ये कापून टाकण्यात आले होते. जिथे 5 ते 6 जण एकत्र बसू शकत होते तिथे आता फक्त तीन जण बसायला जागा होती. याच्या निषेधार्थ केरळच्या तरूण-तरूणींनी 'लॅपटॉप आंदोलन' सुरू केले आहे. 


सीईटीच्या मुलींनी मुलांच्या मांडीवर बसून मॉरल पोलिसिंगचा जाहीर निषेध केला. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी बसस्थानकावर जोरदार आंदोलन करून स्थानिकांना खुले आव्हानही दिले आहे. तसेच आपण आपल्या पद्धतीने जगण्यास मोकळे आहोत, असे स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान या आंदोलनात आता पुढे काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.