Kerala Employees: सध्या सरकारी सेवा निवृत्त झालेल्यांच्या पोस्ट पहात आहात का? अचानक इतकेजण कसे काय रिटायर्ड होऊ लागले? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? खरंतर  प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला सरकारी सेवेत आपला कार्यकाळ पूर्ण केलेले कर्मचारी सेवानिवृत्त होतात. पण यावेळची मे महिन्याची 31 तारीख केरळसाठी अनोखी ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

31 मे 2024 ला केरळमध्ये हजारोंच्या संख्येत लोक एकाच वेळी सेवानिवृत्त झाले. तसं तर हे दरवर्षीचंच आहे. पण यावर्षीच्या 31 मे ला तब्बल 16 हजार कर्मचारी एका झटक्यात सेवामुक्त झाले.  यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढला आहे. हा भार साधासुधा नसून तब्बल 9 हजार कोटींचा आहे. आता इतकी रक्कम सरकार कुठून देणार? असा प्रश्न उभा राहतो. 


केरळ राज्याची प्रति व्यक्ती जीडीपी ही भारताच्या सरासरी जीडीपीच्या तुलनेत 1.6 टक्के जास्त आहे. सध्या केरळ आर्थिक संकटांचा सामना करत आहे. तिथल्या सरकारने बहुतांश कर्मचाऱ्यांचे पेमेंट करताना आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे पेन्शन देण्यासाठी विलंब होतोय. 


केरळ सरकारची आर्थिक स्थिती या महिन्याच्या सुरुवातीलाच गडबडली. इथले सरकार महिन्याच्या सुरुवातीपासूनच ओव्हरड्राफ्टमध्ये चालले आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना एकावेळी त्यांच्या पेन्शनची रक्कम देणे हे सरकारसमोर मोठे आव्हान बनले आहे. रिटायर्ड होणाऱ्यांच्या आकड्याचा विचार सरकारने आधीच करायला हवा होता. त्यानुसार त्यांना आर्थिक नियोजन करता येणे शक्य होते, असे म्हटले जात आहे. 


31 मे रोजी इतके लोक का होतात रिटायर्ड?


अनेकजणांचे वाढदिवस आपण 1 जून ला साजरा करतो. कारण त्यांची जन्म तारीख 1 जून असते. जी शाळेतून टाकून दिलेली असते. बर्थ सर्टिफिकेट अनिवार्य होण्याआधी केरळमध्ये जेव्हा मुले शाळेत प्रवेश घ्यायचे तेव्हा शाळेकडून सर्रास 31 मे तारीख टाकली जायची. या कारणामुळेच मे महिन्यात केरळमध्ये सर्वाधिक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. 


त्यामुळे कालच्या 31 मे रोजीच नव्हे तर  दरवर्षीच्या 31 मेला रिटायर्ड होणाऱ्यांची संख्या मोठी असते. 31 मे 2023 मध्ये 11 हजार 800 कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते.