केरळ : जास्त केस असणे ही समस्या पुरुष आणि स्त्री या दोघांना असतातच. पुरुषांना या समस्येचा जास्त त्रास होत नाही. पण महिलांना मात्र या समस्येचा जास्त त्रास होतो. कारण तोडांवर आणि हातावर असलेल्या महिलांचे केस नेहमीच चार चौघांच्या चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र त्या चार चौघांची पर्वा न करता एक महिला बिनधास्तपणे चेहऱ्यावर मिशा मिरवतेय, आणि या गोष्टीचा अभिमान असल्याचेही ती सांगतेय. त्यामुळे या महिलेची ही हटके स्टोरी आहे तरी काय जाणून घेऊयात.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळच्या कन्नूर जिल्ह्यात राहणाऱ्या 35 वर्षीय शायजा या चेहऱ्यांवरील मिशांमुळे चर्चेत आल्या आहेत. तिच्या या वागण्यावर काहींनी तिला पाठिंबा दिला तर काहींनी टोमणे देखील मारले आहेत.मात्र या टोमण्यांना न जुमानत त्या बिनधास्तपणे चेहऱ्यावर मिशा ठेवत त्याला ताव देताना केरळच्या  रस्त्यावर दिसतात.  
 
मिशा आयुष्याचा भाग 
चेहऱ्यावर मिशा ठेवण्याबाबत अनेक नागरिक विचारतात, यावर शायजा म्हणतात, मला मिशी ठेवायला आवडते. या मिशा काढून टाकाव्या असे त्यांना कधी वाटले नाही. जग तिच्याबद्दल काय विचार करते याची तिला पर्वा नाही, मात्र मिशीशिवाय ती राहू शकत नाही, असे शायजा सांगते.
 
शायजा पुढे म्हणते, मला जे आवडते ते मी करते. जर मला दोन जीवन जगण्याची संधी मिळाली असती तर कदाचित मी इतरांसाठी जगेण असे ती म्हणते. दरम्यान चेहऱ्यावरून मिशा काढाव्यात असे तिला कधीच वाटले नाही. त्यामुळे आता ती जगाचीही पर्वा न करता रस्त्यावर मिशांना ताव देत चालत असते.  


कोरोना काळातला अनोखा किस्सा
शायजा यांचे मिशीवरील प्रेम तुम्हाला त्यांच्या या कृतीवरून समजू शकते. कोरोना महामारीत त्यांना मास्क घालणे आवडत नव्हते. कारण त्यामुळे त्यांच्या मिशा लपल्या जात होत्या. आणि त्या लपल्या जाव्यात असे त्यांना कधीच वाटत नव्हते. त्यामुळे त्या मास्क घालणे टाळायच्या.  


पहिल्या महिला
चेहऱ्यावर मिशा असलेल्या शायजा जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, 2016 मध्ये हरनाम कौर ही संपूर्ण दाढी ठेवणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली होती.  


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शायजाने गेल्या दहा वर्षांत अनेक ऑपरेशन्स केले आहेत. अनेक आरोग्यांच्या समस्यांमधून बाहेर पडून शायजा आता खुपच कठोर झाल्या आहेत. आता त्यांना कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही आहे. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांनी असे जीवन जगले पाहिजे जे त्यांना आनंदी करेल. 


दरम्यान अनोख्या शैलीत आयुष्य जगणाऱ्या शायजा या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या मिशा मिरवण्याच्या स्टाईलने सर्वेचं अवाक झाले असून सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु आहे.