तिरूवअनंतपुरम: केरळातल्या भयावह पुरात आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जवान अक्षरशः देवासारखे मदत कार्यात धावून आलेत. एर्नाक्युलम जिल्ह्यात अलुवा गावात एका घराच्या गच्चीत एक गर्भवती महिला पुरामुळे अडकली होती. अतिशय कठीण परिस्थितीत असलेल्या या महिलेची नेव्हीच्या हेलिकॉप्टरमुळे सुटका झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्पितळात या महिलेला हलवण्यात आलं. त्यानंतर या महिलेची प्रसुतीही झाली. नेव्हीच्या या कार्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी त्या घराच्या गच्चीत इंग्रजीत थँक्यू असा संदेश रंगवण्यात आलाय. गावाच्या वरून उडणाऱ्या प्रत्येक विमानातून हा संदेश लक्ष वेधून घेतो. देवासारखे धावून आलेल्या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा ग्रामस्थांचा संदेश खरोखर सुंदर..