नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून खेळणाऱ्या स्पिनर केशव महाराजने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वंशाचा हा खेळाडू दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आपल्या स्पिन बॉलिंग आणि बॅटिंगमुळे त्याने आपली एक वेगळी ओळख तसेच टीममध्ये जागा निर्माण केली आहे.


केशव महाराज याला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये कुठलाही विकेट मिळाला नाही. मात्र, ज्यावेळी पिचवर रन्स बनत नव्हते त्यावेळी त्याने ३० रन्सपेक्षा अधिक रन्सची इनिंग खेळत मोठा स्कोअर करण्यात मदत केली.


दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेत ३३५ रन्स बनवले. त्यानंतर टीम इंडिया मैदानात बॅटिंगसाठी उतरली आणि त्यांच्यासमोर फास्ट बॉलर वेर्नोन फिलेंडर किंवा रबाडा नव्हता तर होता केशव महाराज...



दक्षिण आफ्रिकेने आपल्या गेल्या १०० वर्षांत असं पहिल्यांदाच केलं की, इनिंगची पहिली ओव्हर फास्ट बॉलरने नाही तर स्पिनरने केली. केशव महाराज याने सेंच्युरियन मैदानात आपल्या पहिल्या इनिंगची पहिली ओव्हर टाकली. केशव महाराज याच्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर ऑबरे फॉकनर याने १९१२ मध्ये इनिंगची सुरुवात केली होती. 


केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेसाठी १६ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्याने २५च्या सरासरीने ५६ विकेट्स घेतले आहेत. केशव महाराज यांचे पूर्वज भारतात राहणारे होते. केशवचे वडील परमानंद हे आपल्या काळात दक्षिण आफ्रिकेत स्थानिक क्रिकेट खेलत होते. केशवचे पूर्वज उत्तरप्रदेशातील सुल्तानपुरहून दक्षिण आफ्रिकेत १८७४ मध्ये गेले होते.


केशव महाराज याने आपल्या करिअरची सुरुवात २०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळत केली होती.