Khalistani Terrorists Plan Terror Attack : प्रजासत्ताक दिनाच्या ( Republic Day ) पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह देशभरात दहशतवादी कारवाया आणि घातपात घडवून आणण्याचा कट खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) रचत आहेत. सीख फॉर जस्टीस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी गुरुपतवंतसिंह पण्णूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केलाय. त्यात त्याने 2023मध्येच पंजाब स्वतंत्र करणार असल्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News India)


5 लाख डॉलर्सचं बक्षीस देण्याची घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच देशात दहशतवादी हल्ले करण्याची धमकी पण्णूने दिली आहे. 26 जानेवारीला घरातच थांबा नाही तर एसजेएफ तुमचा नायनाट करेल अशी धमकी पण्णूने दिली आहे. लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा लावणाऱ्याला 5 लाख डॉलर्सचं बक्षीस देण्याची घोषणाही त्याने केली आहे.


पाकिस्तान, अमेरिकेत खलिस्तानी गट सक्रीय


पाकिस्तान, कॅनडा, अमेरिकेत असलेले हे खलिस्तानी दहशतवादी गट सध्या कमालीचे सक्रीय झालेत. सोशल मीडियावर खलिस्तानी गटांकडून सातत्याने भारत विरोधी लिखाण केलं जात आहे. भारतात पुन्हा हातपाय पसरण्याचा प्रयत्न खलिस्तानी गट सतत करत आहेत. पण सुरक्षा दल हे कट यशस्वी होऊ देत नाहीत. त्यामुळे आता खलिस्तानी गट पाकिस्तानची मदत घेत आहेत. 


दिल्लीत दोघा संशयितांना अटक



दरम्यान, प्रभावशाली हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याच्या दहशतवाद्यांचा कटआहे. हा कट पकडण्यात आलेल्या दोघा संशयितांकडून ही माहिती मिळाली आहे. चार दहशतवादी देशात लपून बसू शकतात, असे दिल्ली पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. दोन संशयित दहशतवाद्यांना राष्ट्रीय राजधानीतून अटक केल्यानंतर काही दिवसांनी ही माहिती समोर आली आहे. या दहशतवादी कटात आठ जणांचा समावेश होता, असे सूत्रांनी सांगितले.  प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या काही दिवस अगोदर ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीसह महत्वाच्या ठिकाणी देशात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.