किंग कोबरा निघाला `छुपा रुस्तम`, लोकांचा जीव टांगणीला; काळजाचा ठोका चुकण्याच्या आत बघून घ्या Video
King Cobra Video : अगुंबे येथील वन्यजीव अधिकाऱ्यांनी एका 12 फूट लांब किंग कोब्राची सुटका केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
King Cobra Mysterious Place : सापाचं नाव जरी काढलं तरी लोकांचा थरकाप उडतो. साप पाहताच लोकं तर वाट मिळेल पळू लागतात. कारण सापाच्या दंशानं आपला मृत्यू होईल अशी भीती लोकांना सतावत असते. सामान्यरित्या वर्दळीच्या परिसरात सापाचं अस्तित्व दिसून येत नाही पण साप दिसला तर सर्वांचीच तारंबळ उडते. अशातच कर्नाटकातील अगुंबे येथील वन्यजीव अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात एका 12 फूट लांब किंग कोब्राची सुटका केली. अगुंबे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशन (एआरआरएस) चे क्षेत्र संचालक अजय गिरी यांनी इंस्टाग्रामवर याचा हादरवणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
नेमकं काय झालं?
झालं असं की, एक 12 फुटी किंग कोबरा आपल्या दररोजच्या सवयीप्रमाणे फिरत होता. पण गावकऱ्यांनी कोब्रा मुख्य रस्ता ओलांडताना पाहिलं. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. लोकांच्या गोंधळाला घाबरून किंग कोबराने एका घरामागील आवारातील झाडीत आश्रय घेतला. भला मोठा किंग कोबरा पाहिल्यावर लोकांची त्रेधातिरपीट उडाली. लोकांनी आजूबाजूच्या लोकांना अलर्ट केलं अन् वनविभाग आणि एआरआरएस अधिकाऱ्यांना तात्काळ संपर्क केला. त्यानंतर अजय गिरी अन् त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.
अधिकाऱ्यांनी यावेळी लोकांना फोन करून काय करू नये याच्या सुचना दिल्या. अजय गिरी आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्व अधिकारी कामाला लागले अन् काठीच्या सहाय्याने सापाला झडपातून खाली उतरवलं. त्यानंतर सापासाठी सापळा रचला अन् एका बॅगमध्ये सापाला अडकवलं गेलं. त्यानंतर सापाटचं वजन करून त्याला जंगलात सोडण्यात आलं.
दरम्यान, अजय गिरी यांनी यावेळी पोस्ट लिहित याची माहिती दिली. 'आम्हाला एआरआरएसला परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. कॉल दरम्यान, आम्ही स्थानिक लोकांना काय करावे आणि करू नये याबद्दल सूचना दिल्या आणि घटनास्थळी पोहोचलो आणि सापाला सुरक्षित केलं. त्यानंतर आम्ही त्याला जंगलात सोडून देत आहोत. आम्ही स्थानिक लोकांसाठी ऑनसाइट जनजागृती कार्यक्रम आयोजित केला, अशी माहिती देखील अजय गिरी यांनी दिलीये.