मुंबई : पाँडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा नाचताना व्हिडिओ शेअर केला होता... हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा - हिराबेन मोदींचा असल्याचा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. परंतु, हा व्हिडिओ हिराबेन यांचा नव्हताच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली चूक लक्षात आल्यानंतर तत्काळ किरण बेदी यांनी आणखीन एक ट्विट करून माफी मागितलीय.


'माझी ओळखण्यात चूक झाली. परंतु, या आईला सॅल्युट... मला आशा आहे की ९६ वर्षांची असताना मीही अशी सक्रिय राहू शकेल' असं त्यांनी पुन्हा ट्विट केलंय.


या व्हिडिओत दिसणारी वृद्ध महिला या हिराबेन मोदी नसून दुसऱ्याच कुणीतरी आहे... त्या नवरात्रीमध्ये गरबा डान्स करताना या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ ३ ऑक्टोबर रोजी ‘Old woman doing garba dance’ नावानं युट्युबवर अपलोड करण्यात आला होता.


काय केलं होतं ट्विट... 


'९७ व्या वर्षात दिवाळीचा उत्साह बघण्यासारखा आहे. या नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन आहेत, ज्या आपल्या घरी दिवाळी साजरी करीत आहेत. मीडियासमोर त्या अनेकदा आल्या आहेत पण गरबा खेळताना त्या पहिल्यांदाच दिसत आहेत' असं किरण बेदी यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.


त्यांचं हे ट्विट जवळपास चार हजार लोकांनी रिट्विट केलं तर ११ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं होतं. सोबतच जवळपास हजारांच्या संख्येनं लोकांनी त्यावर कमेंट केल्या होत्या.