Captain Anshuman Singh: कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर कीर्ति चक्र देऊन सन्मानित करण्यात आला. त्यांची पत्नी स्मृती सिंह यांनी जड अंतकरणाने हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. यावर एका यूझरने अश्लील कमेंट केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करा तसेच कडक कारवाईदेखील करा असे निर्देश महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणातील आरोपी दिल्ली येथे राहणारा असल्याचे समोर आले. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना एक पत्र लिहून कायद्याच्या प्रावधनांचा उल्लेख केलाय. यामध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) चे कलम 79 आणि आयटी अधिनियम 200 चे कलम 67 यांचा समावेश आहे. 


बीएनएस अंतर्गत 3 वर्षांची शिक्षा 


भारतीय न्याय संहिताच्या कलमानुसार महिलांच्या आत्मसन्मानास ठेच पोहोचेल अशी हेतून केलेल्या कृत्यास दंडाची तरतूद आहे. आयटीच्या अधिनियमानुसार इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अश्लील साहित्याच्या प्रकाशनाशी हे संबंधित आहे.


या गुन्ह्यातील आरोपीला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास कठोर दंड ठोठावण्यात येईल. याचा उल्लेख राष्ट्रीय महिला आयोगाने आपल्या पत्रात केला आहे.  


पोलिसांनी 3 दिवसात करावी कारवाई 


स्मृती सिंह यांच्या फोटोखाली अश्लील कमेंट करणाऱ्या यूजरविरोधात प्राथमिक गुन्हा नोंदवून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी निष्पक्ष आणि वेळेत कारवाई पूर्ण करावी असेही म्हटलंय. तसेच 3 दिवसांच्या आता केलेल्या कारवाईचा रिपोर्ट दाखल करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. 


कीर्ति चक्र विजेते कॅप्टन अंशुमन सिंह हे पंजाब रेजिमेंटच्या 26 बटालियनच्या सैन्याच्या मेडिकल कोरचे भाग होते. ऑपरेशन मेघदूत दरम्यान ते सियाचिनमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत होते. 19 जुलै 2023 रोजी सियाचिच्या चंदन ड्रॉपिंग झोनमध्ये भीषण अग्निदुर्घटना झाली. यावेळी अंशुमन यांनी तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. ही आग इतकी भीषण होती की मेडिकल इन्व्हेस्टिगेशन सेंटरपर्यंत पसरली. त्यावेळी जिवाची पर्वा न करता अंशुमन यांनी तेथे मदतकार्य केले होते.